महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून राखी बांधून गृहमंत्र्यांचं रक्षाबंधन साजरं

महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून राखी बांधून गृहमंत्र्यांचं रक्षाबंधन साजरं

Published by :

रक्षाबंधन सणाचं औचित्य साधत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने गृहखात्यातील महिला पोलिसांबरोबर वळसे पाटील यांनी राखी बांधून घेत सण साजरा केला.

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे वळसे पाटील यांना मंचर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अंमलदार मनीषा शेळके-गाढवे यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com