Ambadas Danve
महाराष्ट्र
Ambadas Danve: अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्बवर शिवसैनिकांमध्ये संताप, रायगडात ठिकठिकाणी निषेध
Shiv Sena Protest: अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रोकड मोजण्याच्या व्हिडिओनंतर रायगडात शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
नागपूर अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कॅशबॉम्ब टाकला. यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज अलिबागसह रोहा, मुरुड या ठिकाणी शिवसैनिकांनी दानवे यांच्या कृत्याचा निषेध केला.
अलिबागमध्ये जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी यांना आणि शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून त्यासाठी दानवे यांनी सुपारी घेतल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
आज अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात एक व्यक्ती रोकड मोजताना दिसते आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
