Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना देखील इंडिगोचा फटका, अचानक फ्लाईट रद्द

IndiGo Crisis: इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत सेवेमुळे आदित्य ठाकरे यांची नागपूर फ्लाईट आज अचानक रद्द झाली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

इंडिगो एअरलाईन्सच्या गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विस्कळीत सेवेचा फटका सर्वसामान्य नागरिकांपासून कलाकार मंडळी आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. ऐन विमान उड्डाणाच्या वेळी प्रवाशांना सांगितले जात आहे की विमान रद्द झाले आहे, ज्यामुळे प्रवासी वर्गामधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या कंपनीच्या गोंधळाचा फटका आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे.

Aaditya Thackeray
Goa Fire Tragedy: गोव्यातील आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

आदित्य ठाकरे यांची इंडिगो फ्लाईट रद्द झाली, ज्यामुळे ते नागपूरला पोहोचू शकले नाहीत. आज त्यांनी इंडिगो फ्लाईटने नागपूरला जाण्याचा नियोजन केला होता, मात्र या गोंधळामुळे ते तसे करू शकले नाहीत. फ्लाईट रद्द झाल्यानंतर, आदित्य ठाकरे सायंकाळी एअर इंडियाच्या विमानाने नागपूरला रवाना होणार आहेत.

Aaditya Thackeray
West Bengal: पश्चिम बंगालमध्ये सामूहिक गीता पठण, विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणं तापलं

इंडिगो एअरलाईन्सच्या अनियमित कारभारामुळे अनेक प्रवाशांना, ज्यामध्ये विद्यार्थी, नागरिक, कलाकार मंडळी आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. आदित्य ठाकरे यांना मुंबईहून नागपूरला जाणे होते, पण फ्लाईट रद्द झाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Aaditya Thackeray
Goa Fire Tragedy: गोव्यातील आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
Summary
  • इंडिगोच्या चार दिवसांच्या गोंधळाचा परिणाम आदित्य ठाकरे यांनाही सहन करावा लागला.

  • मुंबई–नागपूर इंडिगो फ्लाईट अचानक रद्द झाल्याने ठाकरे नाराज.

  • ते आता एअर इंडियाच्या विमानाने नागपूरला रवाना होणार आहेत.

  • विद्यार्थी, नागरिक, कलाकार, नेते अशा सर्व प्रवाशांना इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे त्रास.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com