पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव; चिकन विक्रीस बंदी

पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव; चिकन विक्रीस बंदी

Published by :

पालघर शहरात बर्ड फ्लूची नोंद झाली आहे. एका पोल्ट्री फार्ममध्ये 45 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील 21 दिवस चिकन विक्रीची दुकाने आणि पोल्ट्रीफार्म बंद ठेवण्याचे आदेश पालघर उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी दिले आहेत.

शहरातील सूर्या कॉलनी येथील सरकारी पोल्ट्रीत तीन-चार दिवसांत अचानक ४५ कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बर्ड फ्लूने त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले. बर्ड फ्लू आढळल्यानंतर या सरकारी पोल्ट्रीमधील ५००हून अधिक कोंबड्या आणि अंडी तसेच पशुखाद्य याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.

तसेच सूर्या कॉलनी येथील सरकारी पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरात खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व चिकन विक्रीची दुकाने आणि पोल्ट्री फार्म पुढील 21 दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. या दुकानांतील कोंबड्या, अंडी, पशुखाद्य तसेच, पक्षी यांचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी महाजन यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com