अमरावती विभागीय युवा महोत्सवात बुलढाण्यावर अन्याय !

अमरावती विभागीय युवा महोत्सवात बुलढाण्यावर अन्याय !

सगळ्याच क्षेत्रात आता लग्गेबाजी, वशीला आणि पक्षपातीपणा होत असल्याची ओरड असताना संगीतसारखी पवित्र क्षेत्रात ही हा संतापजनक प्रकार सुरु आहे.
Published by :
Team Lokshahi

सगळ्याच क्षेत्रात आता लग्गेबाजी, वशीला आणि पक्षपातीपणा होत असल्याची ओरड असताना संगीतसारखी पवित्र क्षेत्रात ही हा संतापजनक प्रकार सुरु आहे. नुकताच अमरावती येथे विभागीय युवा महोत्सवात अशीच बेईमानी झाली.असल्याचा आरोप आहे सर्वच बाबतीत उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या बुलढाण्याच्या टिमला डावलून अमरावतीच्या टिमला प्रथम क्रमांक देण्यात आला. यासंबंधीची तक्रारही वरिष्ठांकडे देण्यात आली आहे. या संपूर्ण विवादात स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक केंद्रबिंदू असल्याचा गंभीर आरोप आहे या परीक्षकांना दोन-दोनदा बोलाविणारे अमरावतीचे जिल्हा क्रीडा कार्यालयसुद्धा विवादास्पद ठरत आहे

अमरावती येथे विभागस्तरीय युवा महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या या युवा महोत्सवाची जबाबदारी क्रीडा विभागाला देण्यात आली आहे. क्रीडा विभागाकडून प्रथम जिल्हास्तरावर युवा महोत्सव घेण्यात आला. त्याठिकाणी प्रथम आलेल्यांना विभागीय स्तरावर पाठविण्यात आले. अमरावती विभागाचा युवा महोत्सव 8 डिसेंबर रोजी अमरावती येथे श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह याठिकाणी दिवसभर रंगला. यात सामूहिक लोकगीत स्पधेर्चा समावेश होता. विशेष म्हणजे बुलढाण्यातून प्रथम आलेल्या फोक आर्टीस्ट ग्रृपने अमरावतीचा विभागीय युवा महोत्सव दणाणून सोडला. ‘टाच मारूनी घोड्याला...’ हे उडत्या चालीचे लोकगीत सादर करीत बुलढाण्याच्या ग्रृपने सभागृहात उपस्थितांची मनापासूनची दाद आणि उत्स्फूर्त टाळ्या मिळविल्या.

त्याशिवाय इतरही जिल्ह्यांचे सादरीकरण चांगले झाले. पण छान, चांगले, उत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट मधील फरक कलारसिकांना कळतो, दुर्दैवानं तो परीक्षकांना कळू नये या बद्दल आश्र्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, सगळ्यांची वाहवा लुटणाऱ्या बुलढाण्याच्या टिमला डावलून अमरावतीच्या परीक्षकांनी डावलून त्यांच्या सोबत भेदभाव केल्याचा आरोप होत आहे तर झेनीथ ग्रृप साँग अमरावतीने ‘लखाबाई पोतराज आलाय भेटीला..’ सादर केले होते गाणे समाधानकारक झाले. पण बुलढाण्याच्या तुलनेत ते फारच सुमार ठरले मात्र त्यांना परीक्षकांनी प्रथम क्रमांक दिला.या विषयी शंका व्यक्त होत आहे या मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उत्कृष्ट सादरीकरण करून अनेकांकडून कौतुकाची थाप मिळूनही प्रथम क्रमांक न मिळाल्यामुळे बुलढाण्याचे कलाकार मात्र हतोत्साहित झाले आहेत. विशेष म्हणजे अमरावतीच्या ग्रृपचे गाणे समूह प्रकारात मोडतच नसताना त्याला क्रमांक मिळाला. बुलढाण्याच्या ग्रृपकडून यासंदर्भात दोन पानांची विस्तृत तक्रार करण्यात आली आहे. त्यात परीक्षकांच्या परीक्षणावर त्यांच्या योग्यतेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत. राहुल तायडे, प्रेम बैसने आणि स्वामिनी सहारे या तिघांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली. ही भूमिका निश्चीतच संशयास्पद आहे. येवढे मात्र खरे की विभागीय युवा महोत्सवात संगीत हरले आणि वशिलेबाजी जिंकली ही सर्वांची भावना आहे कलेशी बेईमानी झाली आणि खरा कलाकार हरला.

अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने 5 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव चे आयोजन केले होते. या महोत्सवात लोकगीत स्पर्धेचे परीक्षणही याच तीन परीक्षकांनी केले होते. तर पुन्हा याच तिघांना विभागीय स्तरावर संधी देणे अनेक प्रश्नांना आणि संशाया ना जन्म देते एव्हढ्या मोठ्या अमरावतीत संगीत विषयामध्ये ‘डॉक्टरेट’ किंवा ‘एम.ए.’ पदवी प्राप्त कुणी व्यक्ती परीक्षक म्हणून अमरावती जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांना मिळाली नाही काय ? लग्न-आर्केस्ट्रांमध्ये गाणी गाणारे गायक परीक्षक म्हणून निवडले गेले. अर्थात अशा गायकांना परीक्षणाची समज नसते, असा आमचा निष्कर्ष मुळीच नाही. पण कलेशी ईमान, सुरांशी प्रामाणिक आणि सत्यावर विश्वास असणारे परीक्षक निवडले गेले पाहीजे होते. ही कलाकारांची भावना आहे परीक्षकांवरील आरोपांबाबतच्या तक्रारीचे अमरावती क्रीडा विभागाने काय केले देव श्री ‘गणेश’ जाणे ! पण या मुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे हे मात्र खरे विभागीय स्पर्धेसाठी एकाच शहरातील परीक्षक का निवडावे? संगीताचे सखोल ज्ञान असणारे पदवी प्राप्त प्राध्यापकांना आयोजकांनी का आमंत्रीत केले नाही? परीक्षक निवडतांना तो निःपक्ष असल्याची खात्री केली गेली पाहीजे. स्पर्धेत सादरीकरण करणार्‍या टिमसोबत परीक्षकांचे काही लागे-बांधे तर नाहीत? हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे मागास जिल्हा असलेल्या बुलढाण्यातून ताकदीचे प्रतिभाशाली कलाकार महानगरच्या लोकांना सहन होत नाही का हा प्रश्न ही यातून डोकावत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com