मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो राहणार बंद

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो राहणार बंद

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी मेट्रो बंद राहणार असल्याची माहिती आहे. जागृतीनगर ते घाटकोपरपर्यंत मेट्रो बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी मेट्रो बंद राहणार असल्याची माहिती आहे. जागृतीनगर ते घाटकोपरपर्यंत मेट्रो बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज होणाऱ्या मोदींच्या रोड शोसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून मेट्रो बंद राहणार असल्याची मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. सहा वाजल्यापासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा बंद असल्याने प्रवाशांनी त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करावे असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

विक्रोळी कांजूरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुन्नाभटी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे, वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी असणार आहे. मुंबईत येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com