कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी

कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी

Published by :

भूपेश बारंगे | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले होते याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी आज रायपूर येथून कालीचरण महाराजांना ताब्यात घेऊन आज सकाळी 11 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

याप्रकरणात पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाकडून नाकारण्यात आली. न्यायालयाने कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याचे त्यांचे वकील विशाल तिबडेवाल यांनी Lokशाहीला सांगितले. दुपारी तीन वाजतानंतर जामीनकरिता अर्ज दाखल करणार असल्याची माहिती ऍड टीबडेवाल यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com