“मला तोंड उघडायला लावू नका, १०० कोटींची वसुली…”, ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेत संतापले

“मला तोंड उघडायला लावू नका, १०० कोटींची वसुली…”, ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेत संतापले

Published by :

काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदेंनी यांनी आज संसदेत महाराष्ट्रातील १०० कोटी वसुलीच्या प्रकरणावरुन बोलताना दिसले. यावेळी त्यांनी "मला तोंड उघडायला भाग पाडू नका," असे म्हणत काँग्रेस खासदारांना इशारा दिला.

ज्योतिरादित्य शिंदे आर्थिक विधेयकासंदर्भात आपलं मत मांडत असतानाच काँग्रेसचे खासदार गोंधळ घालू लागले. त्यावेळेस ज्योतिरादित्य यांनी, "मला तोंड उघडायला भाग पाडू नका," असा इशारा काँग्रेस खासदारांना दिला. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसला राज्यातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या वसुलीवरुन सुनावलं.

यावेळी काँग्रेसच्या काही खासदारांनी पेट्रोल-डीझेलच्या किंमतींवरुन आरडाओरड सुरु करत त्यांच्या भाषणामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावर स्पष्टीकरण देताना शिंदे यांनी, इंधनाचे दर वाढले आहेत हे जरी सत्य असलं तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यालाही मर्यादा असते असं म्हणत इंधनदर वाढीचे गणित विरोधी पक्षाला समजावून सांगितलं. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरील खर्च वजा केल्यानंतर राज्यांना ४० टक्के तर केंद्राला ६० टक्के पैसे मिळतात. त्यापैकी ४२ टक्के पैसे केंद्राकडून राज्यांना परत जातात. त्यामुळे राज्यांना एकूण टक्क्यांपर्यंत पैसे मिळतात तर केंद्राकडे केवळ ३६ टक्के असतात, असं स्पष्टीकरण ज्योतिरादित्य शिंदेंनी दिलं. इंधन दर वाढीच्या संदर्भात ज्योतिरादित्य शिंदेंनी यांनी ज्यांची स्वत:ची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसच्या खासदारांना खडे बोल सुनावले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com