वर्धा जिल्हा न्यायालयात कालीचरण बाबाला हजर केल्यानंतर पुन्हा रायपूरला रवाना

वर्धा जिल्हा न्यायालयात कालीचरण बाबाला हजर केल्यानंतर पुन्हा रायपूरला रवाना

Published by :

भूपेश बारंगे | महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण सराटला आज वर्धा पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. रायपूर येथून पहाटे तीन वाजता आणल्यावर कालीचरण महाराज यांना सेवाग्राम पोलीस ठाण्यात चौकशी करिता ठेवण्यात आले होते. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सेवाग्राम येथून पोलिसांच्या वाहणातून महाराजांना न्यायालयात नेत असताना महाराजाने परत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पोलिसांच्या वाहनातून महाराजने 'जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीये'चा वादग्रस्त नारा दिला आहे.

छत्तीसगढ राज्यातील रायपूरच्या धर्म संसदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरुद्ध अभिजित उर्फ कालीचरण सराग महाराज यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून वर्ध्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी वर्ध्याच्या शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या विरुद्ध शहर पोलिसांनी कलम 153/ 505 (2) भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. वर्धा पोलिसांनी मंगळवारी रायपूर गाठले. रायपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आधीच कालीचरण महाराज याच प्रकरणात असल्याने पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांना वर्ध्यात आणण्यात आले. वर्ध्यात पहाटे तीन वाजताच्या सुमारास आणण्यात आले आहे.

सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. वर्धा प्रथम वर्ग न्यायालयात न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने कालीचरण महाराजांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयात 11 वाजून 11 मिनिटांनी हजर करण्यात आले होते. तर आधीच रायपूर येथील तुरुंगात असलेल्या कालीचरण यांना पुन्हा रायपुला रवाना करण्यात आले आहे. वकील विशाल तिबडीवाल यांनी जमिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

वर्ध्यात आणताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील यावेळी लावण्यात आला होता. वर्ध्याच्या गांधी पुतळ्याजवळ गांधीवादी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक आत्मक्लेश धरणे देखील करण्यात आले.

गांधी बद्धल उठसुठ कोणीही काहीही बोलतात. राष्ट्रपित्याच्या विरुद्ध आक्षेपार्ह बोलणे म्हणजे शांतता भंग होणे या गोष्टीला आळा बसावा म्हणून जिल्ह्यात आम्ही वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असल्याने तो विरोध होणे अपेक्षित आहे, त्यामुळे आम्ही तक्रार केली. घटना येथील नसल्याने गुन्हा दाखल होत नव्हता, परंतु आम्ही पोलीस यंत्रणेला हा शांतता भंग करण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आणून दिले त्यानुसार कारवाई झाली.

मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस वर्धा.

29 डिसेंम्बर रोजी मनोज चांदूरकर यांनी तक्रार केली होती. त्यानुसार आम्ही अभिजित उर्फ कालीचरण महाराज याला रायपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले, वर्ध्याच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या नायालायात पेश केले. त्यानुसार न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

-पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com