कार्तिकी एकादशीची पूजा कोणाच्या हस्ते होणार? आज मंदिर समितीची बैठक

कार्तिकी एकादशीची पूजा कोणाच्या हस्ते होणार? आज मंदिर समितीची बैठक

कार्तिकी एकादशीची पूजा कोणाच्या हस्ते होणार
Published by :
Siddhi Naringrekar

पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही मंत्री , आमदार , खासदार यांना महापूजेसाठी बोलावू नये असे पत्र मंदिर समितीला दिले आहे. सामान्य वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा करा मात्र जर उपमुख्यमंत्री अथवा कोणीही मंत्री आल्यास त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करायचे की अजित पवार यांना या समितीसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

आज दुपारी मंदिर समितीच्या बैठक होणार आहे. गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळे आजच्या या मंदिर समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com