कोल्हापूरकरांनी कोरोना योद्ध्यांना केला ‘मनापासून’ सलाम, शहरात झळकले फ्लेक्स

कोल्हापूरकरांनी कोरोना योद्ध्यांना केला ‘मनापासून’ सलाम, शहरात झळकले फ्लेक्स

कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सलाम केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा महिन्यांपासून कोरोणाच्या अभूतपूर्व संकटाशी सर्वजण लढत आहेत. याला समर्थपणे मदत करणाऱ्या कोल्हापूर शहरातील स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्या कौतुकाचे पोस्टर्स पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून झळकवले असून कोल्हापूरकरांना मनापासून सलाम या हॅश टॅग माध्यमातून लावण्यात आले आहेत. (covid yodha)

पडद्यामागे राहणारे हे जनसामान्य हेच खरे संकट काळातील हिरो आहेत अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचे कौतुक करत शहरात सर्वत्र मोठे पोस्टर्स झळकले आहेत. यामध्ये व्हाईट आर्मी , ड्रीम टीम मध्ये काम करणाऱ्या युवा पिढीतील तरुणी , ऍम्ब्युलन्स चालवणारी युवती यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कोरोना योध्याचा पोस्टरमध्ये समावेश आहे. शहरातील ताराराणी चौक ,बिंदू चौक, दाभोळकर कॉर्नर ,दसरा चौक या परिसरामध्ये सध्याही पोस्टर्स नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com