कुणाल राऊत युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी, ऊर्जामंत्र्यांचेच लागतात तरी कोण ?

कुणाल राऊत युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी, ऊर्जामंत्र्यांचेच लागतात तरी कोण ?

Published by :

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Maharashtra Pradesh Youth Congress) अध्यक्षपदी कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी राऊत यांना निवडीचे पत्रही दिले आले. त्यामुळे राज्यभर त्यांच्या चाहत्यांनी व युवक काँग्रेस सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीकरिता प्रदेशाध्यक्ष पदाकरिता 14 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता कुणाल राऊत (Kunal Raut) यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्फोटक नेतृत्वात आपण पक्ष कार्याला बळकटी द्याल. तसेच, पक्षवाढीसाठी कष्टाने काम कराल, असा मला विश्वास आहे, असेही श्रीनिवास यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कोण आहेत कुणाल राऊत?

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांचे कुणाल राऊत (Kunal Raut) पूत्र आहेत. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com