लातूर शहरात नागरिकांचा कचरा डेपोला विरोध

लातूर शहरात नागरिकांचा कचरा डेपोला विरोध

Published by :

लातूर: लातूर शहर महानगरपालिका देशातील स्वच्छता जोपासण्यात अग्रेसर महानगरपालिका असताना, शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील श्रीनगर गल्लीत महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्याचे विलगिकरण करण्यासाठी कचरा डेपो उभारण्यात आला आहे. परंतु सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी कचरा डेपोला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याचे दमट वातावरणात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. शहरातील अनेक नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. यावर लातूर शहर महानगरपालिका कोणतीही कार्यवाही करत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

त्यामुळे महानगरपालिकेने कचरा डेपो तात्काळ शहराबाहेर हलवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत; अन्यथा या कचरा डेपोला टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com