arrested-for-taking-bribe
arrested-for-taking-bribe

नांगदावच्या लिपीकास ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

Published by :

नांदगांव तहसील कार्यालयाच्या लिपिकास ५० हजारांची लाच घेताना मध्यस्थ्यासह रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

मृत्यू पत्राद्वारे मिळालेल्या शेतजमीनीस तक्रारदाराच्या आजोबांचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. या प्रकरणात एका मध्यस्थाचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लिपिक समाधान निंबा पवार व मध्यस्थी नितीन अण्णा सोनवणे अशी लाच स्वीकारणाऱ्यांची नावं आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com