विखुरलेला विरोधी पक्ष हीच भाजपाची स्थिती आहे – संजय राऊत

विखुरलेला विरोधी पक्ष हीच भाजपाची स्थिती आहे – संजय राऊत

Published by :

गोव्यात (goa) विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यापासून गोव्यातलं सुध्दा राजकारण तापलं आहे. तसेच सद्या सत्तेत असलेल्या भाजपने (bjp) गोव्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी चांगलीत कंबर कसलेली आहे. या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) देखील दंड थोपटून मैदानात उतरली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत आज गोव्यात शिवसेनेनं पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापैकी 8 उमेदवारांची यादी आज सेनेनं जाहीर केली असून, गोव्यात शिवसेना 10 ते 12 जागा लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गोव्याच्या निवडणुकीसाठी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे बडे नेते प्रचारासाठी उतरण्याची शक्यता आहे. यावेळी संजय राऊत यांनी गोव्याच्या राजकारणावर परखड भाष्य केलं.

गोव्यात गेल्या काही वर्षांपासून, प्रस्थापित लोकांचं राजकारण सुरू आहे. यामध्ये आलेमाओ-गेलेमाओ वृत्तीच्या लोकांचा जास्त समावेश असल्याचं म्हणत त्यांनी दलबदलू आमदारांवर टीका केली. गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार असून, आणखी कुणाला सोबत यायचं असल्यास त्यांनी तसा प्रस्ताव दिल्यास विचार करू असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंत महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com