राजकारण
Ajit Pawar : संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले...
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे. कुठे जाणार मला माहित नाही. पण गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला रंग भगवा आहे.
यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, विरोधक आम्हाला शिव्या देतात, शाप देतात काहीही बडबडतात.
कोण कुणाला सरडा म्हणत. कोण कुणाला ढेकूण म्हणतं. ढेकूण आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार आहेत का? महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे का? असे अजित पवार म्हणाले.