Beed: बीडमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल होतात ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झाला आहे. जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती.
याच दरम्यान राज ठाकरे दाखल होतात त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचे पाहायला मिळालं आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यामुळेच हा राडा झाला आहे, दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली आहे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
बीड मधील जालना रोड परिसरात असणाऱ्या अन्विता हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची बैठक होत होती. याच बैठकीपूर्वी राज ठाकरे यांचा ताफा अडवून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सुपारी अंगावर फेकून राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळे ते नेमकी कुणाची सुपारी घेऊन आले असा जाब विचारून निषेध केला आहे.