Nana Patole : महाराष्ट्रामध्ये काही सिटींग भाजपचे आमदारसुद्धा काँग्रेसच्या मार्गावर
भंडारा-गोंदियाचे भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये काही सिटींग आमदारसुद्धा भाजपचे काँग्रेसच्या मार्गावर आहेत. ही एक सुरुवात आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरण महाराष्ट्र हा बेरोजगारांचा महाराष्ट्र असा हा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने महाराष्ट्राला त्यापद्धतीचे भंगार करण्याचे काम या लोकांनी केलेलं आहे. महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही. गरीब माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे. सगळीकडे महागाईची आग आहे. त्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर जो आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक राजकीय व्यक्ती त्याला असं वाटतं की काँग्रेसमध्येच महाराष्ट्र सुरक्षित राहू शकतो. असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. शिशुपाल पटले यांना लक्षात आलं ज्या भाजपमध्ये आपण अनेक वर्ष काम केलं ती भाजप महाराष्ट्रद्रोही आहे. अशा पद्धतीचे जे चित्र निर्माण झालं. त्यामुळे शिशुपाल पटलेजी माजी खासदार आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. मला विश्वास आहे की, त्यांचा अनुभव आणि त्यांनी जे भंडारा- गोंदियामध्ये त्यांनी जनसेवा जी केली, लोकांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. असं नेतृत्व आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसबरोबर आलेलं आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आज वातावरण जे महाराष्ट्रामध्ये आहे जे निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी. काल पण आपण पाहिलंत. लोकशाहीची जी दोन चाकं असतात. त्याच्यामध्ये विपक्ष आणि सत्ता. प्रधानमंत्री त्यांचा अधिकार आहे लाल किल्ल्यावरुन भाषण देणं, त्यांचा तो मान आहे. पण अपोजिशन लीडर त्यांच्यासुद्धा लोकशाहीतला एक मान आहे. पण त्यांना अपमानित कसं केलं हे पूर्ण देशाने नाही जगानं पाहिले. देशामध्ये लोकशाहीच राहिली नाही. असं चित्र निर्माण जे झालेलं आहे.
एवढा गर्व की, लोकशाही व्यवस्थेला मानायचं नाही. अशा पद्धतीचे चित्र काल राहुल गांधी यांना मागच्या लाईनमध्ये बसवून त्यांनी अपमान केलेला आहे. खऱ्या अर्थाने राहुल गांधी यांचा अपमान नाही, लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे. पूर्ण देशामध्ये याविषयाची गंभीर चर्चा आहे आणि भाजपच्याविरोधातला आघात जनतेच्या मनात आपल्याला पाहायला मिळत आहे. असे नाना पटोले म्हणाले.