शिंदे गुवाहाटीला असताना NCP भाजपासोबत जाणार होती; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

शिंदे गुवाहाटीला असताना NCP भाजपासोबत जाणार होती; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता प्रफुल्ल पटेल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शिंदे गुवाहाटीला असताना राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार होती. भाजपासोबत जाण्यासाठी 51 आमदारांच्या सह्यांचे पत्र दिलं होते. शरद पवारांनी निर्णय घेतला नाही आणि शिंदेंनी संधी साधली. भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया 2022मध्यातच सुरु झाली होती. मात्र भाजपासोबत जाण्याच्या निर्णय वेळीच घेण्यात पक्ष नेतृत्व अपयशी ठरले.

शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचे होते. शिवसेनेसोबत जुळवून घेऊ शकतो तर भाजपासोबत का नाही? अशी अनेक नेत्यांची भावना होती. आता राष्ट्रहितासाठी आम्ही भाजपात सामील झालो. 2024 च्या लोकसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वात तर विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढणार असे पटेल म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com