महिलेवर प्राणघातक हल्ला; अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

महिलेवर प्राणघातक हल्ला; अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

अवघ्या पाच तासात खडकपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली
Published by :
Team Lokshahi

कल्याण : मध्यरात्री झोपेत असलेल्या महिलेवर धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला अवघ्या पाच तासात खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचे नाव हरीश जोशी आहे. दरम्यान, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच जण कौतुक करत आहेत.

महिलेवर प्राणघातक हल्ला; अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
अफगाणिस्तानच्या भूकंपातील मृतांचा आकडा 2 हजारांवर; तर 9 हजारांपेक्षा अधिक जण जखमी

कल्याण पश्चिम कोळवली परिसरातील वैशाली भोईर चाळीत राहणाऱ्या नितेश पाल हा बेकरीत कामाला आहे. तो काल रात्री कामावर गेल्यावर त्याची पत्नी सोनम पाल ही घरात एकटीच झोपली होती. खिडकीवाटे प्रवेश करुन हल्लेखोर आला. त्याने धारदार हत्याराने तिच्यावर वार केले. या घटनेत सोनम गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या प्रकरणातील हल्लेखोरास खडकापाडा पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली आहे. हल्लेखोराचे नाव हरीश जोशी असे आहे. हरीशने जेव्हा त्या महिलेच्या घरात खिडकीवाटे प्रवेश केला होता. तेव्हा त्याने चप्पल त्याठिकाणी काढली होती. हल्ला करुन पसार होताना तो चप्पल खिडकीबाहेरच सोडून गेला. पोलिसांनी त्या आधारे आरोपीचा शोध घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com