Maharashtra Rain : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे. यातच अनेक भागात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

केरळमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच देशातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीवर तापमानात घट झाली आहे. आज आणि उद्या तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com