Maharashtra Winter Session : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात 33पेक्षा जास्त मोर्चे धडकणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
आजपासून विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळेल तसेच विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे.
आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून पहिल्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर दुसऱ्या दिवशीही विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून विरोधकांकडून पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावरून विरोधक सत्ताधाऱ्याना घेरण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात 33पेक्षा जास्त मोर्चे धडकणार असल्याची माहिती मिळत आहे. 22 संघटनांनी धरणे आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला परवानगी मागितली आहे.
Summery
हिवाळी अधिवशेनात 33 पेक्षा जास्त मोर्चे धडकणार
22 संघटनांना धरणे आंदोलनाची परवानगी
17 संघटनांना साखळी उपोषणाला परवानगी
