mohit kamboj
mohit kamboj

मोहित कंबोज वाहन हल्ला प्रकरणी पोलीसांची मोठी कारवाई...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर शिवसैनिक आंदोलन करत असताना ही घटना घडली होती.
Published by :

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या वाहनावरील हल्ला प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सांताक्रूझ पोलीस (Santacruz Police) ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर शिवसैनिक आंदोलन करत असताना ही घटना घडली होती. या हल्ल्यात मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या वाहनाचं नुकसान झालं होत. मात्र कंबोज या अपघातात वाचले होती.

कलानगर जंक्शन परिसरात हा हल्ला करण्यात आला. त्याठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी होती, त्यांच्यापैकीच कुणीतरी हे कृत्य केलं आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर मोहित कंबोजवरील (Mohit Kamboj) हल्ला व शनिवारी रात्री किरीट सोमय्याच्या गाडीवर झालेली दगडफेक, या घटनेवरून भाजपा आक्रमक झाली होती. यानंतर आता पोलीसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. सांताक्रूझ पोलीस (Santacruz Police) ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच पुढील तपासासाठी हे प्रकरण खेरवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com