Kolhapur Municipal Elections
Kolhapur Municipal Elections

Kolhapur Politics: कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला पुन्हा जोरदार धक्का; माजी महापौरांची मुलासह शिवसेनेत जाहीर प्रवेश

Kolhapur Municipal Elections: कोल्हापुरात शिवसेनेला मोठी वाढ मिळाली असून सई खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एक जोरदार धक्का काँग्रेसला दिला आहे.

Kolhapur Municipal Elections
Goa Fire Tragedy: गोव्यातील आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर सई खराडे आणि शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे भगवा ध्वज देवून शिवसेनेत स्वागत केले. या पक्ष प्रवेशासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला.

Kolhapur Municipal Elections
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना देखील इंडिगोचा फटका, अचानक फ्लाईट रद्द

माजी महापौर सई खराडे यांनी यापूर्वी चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. त्या माजी कृषी मंत्री कै.श्रीपतराव बोंद्रे यांची पुतणी, कोल्हापुरातील गोरगरीब जनतेला न्याय देणारे एक प्रकारे खाजगी कोर्ट असणारे जेष्ठ नेते कै.महिपतराव बोंद्रे यांची कन्या, काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले (दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे) उमेदवार कै.सखाराम बापू खराडे यांच्या स्नुषा आहेत.

सई आणि अजित खराडे यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासोबत माजी महापौर को.म.न.पा. अॅड. महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव तसेच 2010 महापालिका निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेले सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांनीही आज शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे पक्षाला मजबूत बळ मिळाले असून कार्यक्रमास माजी आमदार सुजित मिनचेकर उपस्थित होते.

Kolhapur Municipal Elections
Shocking News: विरारमध्ये कर्जबाजारीपणामुळे व्यक्तीची आत्महत्या, वाचवायला गेलेली पत्नी आणि भाचा जखमी
  • सई खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठी राजकीय घोषणा.

  • काँग्रेसला कोल्हापुरात पुन्हा मोठा धक्का बसला.

  • आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद आणि संघटना बळकट.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com