Maratha Resrvation : मराठा समाजाचं आजपासून रास्तारोको आंदोलन

Maratha Resrvation : मराठा समाजाचं आजपासून रास्तारोको आंदोलन

सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
Published by :
Siddhi Naringrekar

सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

याच पार्श्वभूमीवर आजपासून मराठा समाजाचं रास्तारोको आंदोलन सुरु होणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजता गावागावांत रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्याच्या विविध भागात मराठा संघटनाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आजपासून आंदोलनाची हाक दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com