महाराष्ट्र
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांची तोफ आज नवी मुंबईत धडाडणार
मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे. या दौऱ्याअंतर्गत त्यांची आज नवी मुंबईतील घणसोली येथे सभा होणार आहे. या सभेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून घणसोली येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर ही सभा संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची लोणावळा येथे सभा झाल्यानंतर दुपारी चार वाजता नवी मुंबईत आगमन होणार असून माथाडी भवन येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.
या मैदानाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून जरांगे पाटील यांच्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे मराठा समाज बांधवांची मोठी लगबग पहायला मिळत आहे.