Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याच्यावेळी मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगेंचे जल्लोषात स्वागत करण्यात येण्याची शक्यता आहे. आज मनोज जरांगे पाटील हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा आज दौरा आहे.

छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज मनोज जरांगे पाटील येणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे की, 9 फेब्रुवारीपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही, तर 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार. असे त्यांनी सांगितले आहे.

आज या नाशिकच्या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com