Sandeep Deshpande : "पी.डब्ल्यू.डी" मध्ये "महा भ्रष्टाचार"...; मनसेच्या संदीप देशपांडे यांचा ट्विट करत आरोप

पी.डब्ल्यू.डीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sandeep Deshpande) पी.डब्ल्यू.डीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदीप देशपांडे याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत पी.डब्ल्यू.डीमध्ये महाभ्रष्टाचार असे म्हणत आरोप केला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत पण योजनेच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर. "पी.डब्ल्यू.डी" मध्ये "महा भ्रष्टाचार"चित्रफितीसह पुरावे देणार. सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद, सार्वजनिक बांधकाम फक्त "खाते". असे म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.

Summery

  • योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत पण योजनेच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर

  • "पी.डब्ल्यू.डी" मध्ये "महा भ्रष्टाचार"

  • मनसेच्या संदीप देशपांडे यांचा ट्विट करत आरोप

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com