Mumbai Girgaon Building Fire: मुंबईत चार मजली इमारतीला भीषण आग; दोन नागरिकांचा मृत्यू

Mumbai Girgaon Building Fire: मुंबईत चार मजली इमारतीला भीषण आग; दोन नागरिकांचा मृत्यू

Mumbai Fire News : मुंबईतल्या गिरगाव येथील गोमंती भवन इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या माळ्याला आग लागल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

Mumbai Fire News : मुंबईतल्या गिरगाव येथील गोमंती भवन इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या माळ्याला आग लागल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन नागरिकांचे मृतदेह बाहेर काढले आहे. तर तीन नागरिकांना बचावण्यात यश आलं आहे.

या आगीच्या घटनेची माहिती मिळल्यावर अग्निशमनदलाच्या 15 गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने दोन तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नऊ जणांना रेस्क्यू करुन वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेत हिरेन शाह (वय, 60) आणि नलिनी शाह (82) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान रेस्क्यू करुन काढलेल्या नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गिरगावमध्ये ही आग कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधत आहेत. आगीच्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गिरगाव चौपाटीमध्ये काल आग लागली होती, त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. ज्यांची घर जळालेले आहे त्यांना पाच लाखांची मदत तत्काळ जाहीर केलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com