सुवर्णसंधी! 'या' जिल्हा परिषदेत लवकरच ९०७ पदाची मेगा भरती

सुवर्णसंधी! 'या' जिल्हा परिषदेत लवकरच ९०७ पदाची मेगा भरती

विविध संवर्गातील ९०७ पदे सरळ सेवेने भरणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

संजय राठोड | यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेत लवकरच ९०७ पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. विविध संवर्गातील ९०७ पदे सरळ सेवेने भरणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत अनेक संवर्गातील पदे रिक्त आहेत. गट 'क' मधील ३५ संवर्गातील ही पदे आता सरळसेवेने भरली जाणार आहेत. त्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासंदर्भात आयबीपीएस कंपनीसोबत राज्य शासनाने करार केला आहे. या कंपनीमार्फतच जाहिरात प्रकाशित होणार आहे. ती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचे डॉ. पांचाळ यांनी सांगितले.

९०७ पदांमध्ये सर्वाधिक महिला आरोग्यसेवकांची २१८ पदे भरली जाणार आहेत. याशिवाय आरेखक, पुरुष आरोग्यसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहायक, जोडारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक, वरिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ लेखाधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आदी पदे भरली जाणार आहेत. या भरतीकडे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com