म्हाडाच्या परीक्षा आता ‘या’ संस्थे अंतर्गत, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

म्हाडाच्या परीक्षा आता ‘या’ संस्थे अंतर्गत, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

Published by :

म्हाडा परीक्षेमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी संबंधित कंपनीच कंत्राट रद्द करण्यात आले आहे.तसेच रद्द केलेली परीक्षा टीसीएस (TCS) या संस्थेमार्फत घेणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार रविवारी उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हाडा परीक्षेमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी संबंधित कंपनीच कंत्राट रद्द करण्यात आले आहे.तसेच रद्द केलेली परीक्षा टीसीएस (TCS) या संस्थेमार्फत घेणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
परीक्षेत पारदर्शकता आणि प्रामाणिक, हुशार, गरीब घरांतून आलेल्या मुलांचे हक्क डावलले जाऊ नये हाच उद्देश आहे त्यामुळे टीसीएस (TCS) सारख्या विश्वविख्यात आणि इतिहासात कधीच चुका केल्या नसलेल्या संस्थेमार्फत आम्ही येणारी परीक्षा घेणार असल्याच मंत्री आव्हाड यांनी सांगितलं आहे.

गेली पाच सात वर्षे ज्या एजन्सीज यासाठी किंवा सरकारी नोकर भरती परिक्षेसंदर्भात काम करत आहेत त्यांच्याकडून सर्व कामे काढुन टीसीएस (TCS) किंवा IBPS सारख्या संस्थेला हि काम देण्यात यावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याच आव्हाड यांनी सांगितलं आहे.

दलालांची माहिती द्या…

गुन्हेगार प्रवृत्तीचे जे विद्यार्थी असतील जे कोणाला हाताशी धरुन जर जागा हिसकावून घेत असतील ते थांबवणं आमचं कर्तव्य आहे आणि याच माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल या इच्छेपोटी पैसे दिलेत त्यांना आम्ही गुन्हेगार ठरवणार नाही त्यात विद्यार्थ्यांची काहीही चुक नाही पण तुम्ही जर दलालांना पैसे दिले असतील तर त्या दलालांची नाव आम्हाला कळवा त्यांना धडा शिकविण्याची जवाबदारी आम्ही घेतो असेही आवाहन आव्हाड यांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com