Bharat Gogawale
Bharat Gogawale

Bharat Gogawale : "महायुतीचा जर धर्म निभावायचा असेल तर..."

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

  • 'महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर..'

  • 'एकमेकांनी 2 पावलं मागे सरकायला हवे.. '

(Bharatshet Gogawale) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे . त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

भरत गोगावले म्हणाले की, "आम्ही कोणाच्या पाठीमागे लागणार नाही , आम्ही त्याच दिवशी जेव्हा जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले तेव्हा आम्ही बैठक घेऊन आमचे जिल्हा प्रमुख आमचे तीन आमदार संपर्क प्रमुख या सर्वांची बैठक घेऊन त्याचवेळी आम्ही सांगितले होते की, 59 रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणिते केली होती."

"त्याचप्रमाणे नगरपालिका आणि पंचायत समिती असताली यामध्ये जर बसत असेल तर गणितं होऊ शकतात. महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी दोन पावलं मागे सरकायला पाहिजे. जर हे होणार असेल तर अन्यथा एकला चलो रे." असे भरत गोगावले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com