”एकच छंद, गोपीचंद”; आता पडळकर समर्थकांची राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

”एकच छंद, गोपीचंद”; आता पडळकर समर्थकांची राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

Published by :

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील दगड हल्ल्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा हात असल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यावरून राजकीय वातावरण तापत असताना आता पडळकर समर्थकांनी "एकच छंद, गोपीचंद" अशा घोषणा देत आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे हा वाद आता चिघळत चालला आहे.

गोपीचंद पडळकर समर्थकांनी आज आक्रमक पावित्रा घेत सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली.

दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com