महाराष्ट्र
मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिक आणि देखभाल–दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिक आणि देखभाल–दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे या काळात लोकल विलंबाने धावणार आहेत.
रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेवर माटुंगा ते ठाणे दरम्यान उप आणि डाउन धीम्या मार्गवर सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यत मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स ते माहिम दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यत ब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गांवरही ब्लॉक असणार आहे. कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे.