”मास्क’ची ‘जादू’ खूप सोपी”

”मास्क’ची ‘जादू’ खूप सोपी”

Published by :
Published on

मुंबई पोलिस आपल्या भन्नाट ट्विटसाठी नेहमीच प्रसिद्ध असतात. यावेळी सुद्धा त्यांनी अशाचप्रकारचे हटके ट्विट करत मुंबईकरांना मास्क परिधान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई पोलिसांनी जादुई दुनियेतला चित्रपट असलेल्या हॅरी पॉटर मधला एक फोटो ट्विट करून मुंबईकरांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. या ट्विटमध्ये मुंबई पोलीस आवाहन करताना म्हणतात… मास्क केवळ 'लकी' नाही तर आपली सुरक्षा करण्यास प्रभावी देखील आहे! मास्क ची 'जादू' खूप सोपी आहे, शिकून घ्या. अशा प्रकरचा संदेश लिहत त्यांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com