Child Vaccination
Child Vaccination

लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज

Published by :

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने लहानश्यांच्या लसीकरणासाठी तयारी केली असून २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी २५० केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार आहे यात ३५ लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. लहानग्यांना लसीचे तीन डोस देण्यात येणार आहेत. मुलांच्या लसीकरणासाठी कोवाव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यामुळे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनेही २०० कोटी डोसचे उत्पादन करण्याचे जाहीर केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाल्यामुळे आता 'आयसीएमआर व केंद्राच्या मंजुरीनंतर तातडीने मुलांचे लसीकरण सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार डोसची उपलब्धता आणि मुलांकडून मिळणारा प्रतिसाद यानुसार केंद्रांची आणि लसीकरणाची संख्या वाढवली जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तीन दिवस ते आठवडाभरात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. लसींचा साठा करण्यासाठी कांजूरमार्गसह इतर ठिकाणी शीतगृह व्यवस्था आहे. लस दिल्यानंतर दुष्परिणाम जाणवल्यास खबरदारी म्हणून लहानग्यांवर बालरुग्ण विभागात उपचार केले जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com