नगर – मनमाड महामार्गाचे काम पुढील पंधरा दिवसात होणार सुरू – नितीन गडकरी

नगर – मनमाड महामार्गाचे काम पुढील पंधरा दिवसात होणार सुरू – नितीन गडकरी

Published by :

कुणाल जमदाडे, शिर्डी / अहमदनगर | केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतले. यावेळी एक वर्षात नगर मनमाड महामार्गाचे काम पूर्ण होईल असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सांगितले.

दिवाळीच्या आधी साईबाबांचं मनोभावे माझं दर्शन झालं .येणारी दिवाळी सर्व नागरिकांना दिवाळी सुखाची जाओ कोरोनामुक्त होवो हीच साईचरणी प्रार्थना केली.साईदर्शनानंतर गडकरींनी माध्यमांशी भाष्य करत पुढील पंधरा दिवसात जलद गतीने नगर मनमाड महामार्गाचे काम सुरू होईल व एक वर्षात नगर मनमाड महामार्गाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com