Girish Mahajan
Girish Mahajan

Girish Mahajan : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल पुढे ढकलला, गिरीश महाजन म्हणाले...

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Girish Mahajan) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर उद्या 3 डिसेंबरला मत मोजणी पार पडणार होती. मात्र आता एक मोठी माहिती समोर येत आहे.काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. यातच सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे उमेदवारांना आता 21 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता गिरीश महाजन म्हणाले की, "उद्याच निकाल लागेल हे सर्वांना अपेक्षित होते. पण यासंर्दभामध्ये न्यायालयाने निकाल दिलेला आहे. असा गोंधळ राज्यामध्ये कधीही झालेला नसेल तो आता झाला असे मला वाटतं. कालपर्यंत नगरपालिका रद्द झाल्या असा गोंधळ पहिल्यांदाच झाला आहे. पण आता विरोधकांना बोलायला पुन्हा संधी मिळाली आहे. असे गिरीश महाजन म्हणाले.

Summery

  • नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल पुढे ढकलला

  • गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

  • "असा गोंधळ राज्यामध्ये कधीही झालेला नसेल तो आता झाला असे मला वाटतं"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com