Maharashtra Financial budget 2022-23
Maharashtra Financial budget 2022-23

अर्थसंकल्पावर महाविकासआघाडीतील घटक पक्षच नाराज!

Published by :
Vikrant Shinde

आज माहाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 2022-23 ह्या आर्थिक वर्षासाठी सादर केला गेला. ह्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. अनेक क्षेत्रांमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले. ह्या अर्थसंकल्पानंतर सर्व राजकीय पक्षांतून संमिश्र प्रतिक्रीया येतायत.

आता महाराष्ट्राच्या सत्तेत शिवसेना व राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लाऊन बसलेल्या काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ह्या अर्थसंकल्पाविषयी नाराजीचा सुर लावल्याने आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आणि आता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवरून राजकीय वर्तुळात भलत्याच चर्चांना उधाण आलंय.

काय म्हणाले नाना पटोले?
"काही दिवसांपासून कोळशाची टंचाई सुरू आहे. औष्णिक ऊर्जेसाठी निधीची आवश्यकता आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेकदा चर्चा झाली आहे. राज्याच्या अर्थ खात्याकडून ऊर्जा खात्याला मिळणारा निधी अद्यापही मिळाला नाही. ही थकबाकी मिळाली पाहिजे. देश विकून कर्ज काढून योजना राबवता येत नाही. मोठमोठ्या घोषणा करता येत नाहीत याची राज्य सरकारला जाण आहे. आजचा अर्थसंकल्प अंथरुण पाहून पाय पसरणारा आहे.ऊर्जा खात्याच्या मागण्यांविषयी सभागृहात आम्ही मुद्दा उपस्थित करणार आहोत."


यामुळे महाराष्ट्रात जुळून आलेलं सत्तेचं समीकरण काँग्रेसच्या नाराजीमुळे कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच फिस्कटणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com