Nitin Nabin : नितीन नबीन यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावर बिनविरोध निवड; आज अधिकृत घोषणा होणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitin Nabin) भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड करण्यात आली आहे. भाजपने14 डिसेंबर 2025 रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ.के.लक्ष्मण यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली.
नितीन नबीन यांच्याकडे पथ निर्माण विभाग तसेच नगर विकास आणि आवास विभाग ही खाती आहेत. नितीन नबीन यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली असून या निवडीसाठी भाजपचे जवळपास सर्व मुख्यमंत्री, राज्य युनिट प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते.
हा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठीचा कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरू झाला होता आणि अर्ज नामांकनप्राप्त आणि समर्थनाच्या जोरावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नबीन यांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज नितीन नबीन यांची अधिकृत घोषणा होणार आहे.
Summary
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
आज नितीन नबीन यांची अधिकृत घोषणा होणार
नितीन नबीन यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावर बिनविरोध निवड
