जोपर्यंत महामार्गाचे कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाही

जोपर्यंत महामार्गाचे कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाही

Published by :

चिपळूण -मुंबई उच्च न्यायालयांत अॅड ओवेस पेचकर यांचे मुंबई गोवा महामार्गावर होणारा चौपद्री करण्याची प्रलंबित जनहित याचिकेवर आज रोजी सुनावणी आज पार पडली, त्यात अॅड ओवेस पेचकर यांनी महामार्गावर पावसाळ्यात पडलेले खड्डे, वाशिष्टी नदी चा रखडलेला पूल, व जुण्या पूलाची दैनहीन अवस्था हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले, ही याचिका मा.मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि मा.न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंड पिठात सूणावनी झाली त्या वर निर्देश देण्यात आले पावसाळ्यात पडले खड्डे यांना भरून घ्यावेत तसेच वाशिष्टी नदी च्या पूलावरून प्रवास करण्याकरता सुरक्षिततेची काळजी म्हणून हॅलोजन लाइट, सेफ्टी लाइट, रीफ्लेकटर इंडीकेटर, त्वरित लावून पूर्तता अहवाल दिनांक 31ऑगस्ट पूर्व उच्च न्यायालयांत सादर करावे.

अॅड. ओवेस पेचकर यांनी चिपळूण शहराच्या लगत असलेल्या महामार्गाचे सांडपाण्याच्या विषयावर कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की महामार्गाची उंची वाढल्या मुळे सांडपाणी व्हावून जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या पाण्या मुळे शहरात सांडपाण्याचा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे,त्या वर महाराष्ट्र राज्य शासनाचे महाधिवक्ता आशुतोष कूंभकोणी यांच्याशी याचिका करत्यानी चर्चा करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या निदर्शनास आणून द्या असे निर्देश आशुतोष कूंभकोणी यांना उच्च न्यायालयाने दिला आहे. अॅड ओवेस पेचकर यांचे उच्च न्यायालयांच्या याचिकेत प्रार्थना केली होती की जो पर्यंत संपूर्ण महामार्गाचे कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल करण्यात येवु नये त्या वर महाराष्ट्र राज्य शासन ने उच्च न्यायालयात हमीपत्रा मार्फत अशी हमी दिली आहे की जोपर्यंत महामार्गाचे कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल करण्यात येणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com