धाराशिवमध्ये 24 जानेवारीला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा

धाराशिवमध्ये 24 जानेवारीला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा

धाराशिवमध्ये 24 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

धाराशिवमध्ये 24 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 17 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये नियोजन न झाल्याने हा मेळावा आता 24 जानेवारी रोजी होणार आहे अशी माहिती सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

या मेळाव्याला छगन भुजबळ,बाळासाहेब आंबेडकर,महादेव जानकर,गोपीचंद पडळकरसह 20 प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळत आहे.

सकल ओबीसी समाजाच्या वतीने २४ जानेवारी रोजी महाएल्गार मेळावा घेण्यात येणार आहे. अशी माहिती अर्जुन सलगर, ॲड. खंडेराव चौरे, सचिन शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com