बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा

बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा

बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलनात 6 वाजता ही सभा होणार आहे. आज बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला मराठा आंदोलक विरोध करण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईला येणार आहे. ओबीसीतूनच मराठा आरक्षणाच्या हवं या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ देणार नाही. अशी भूमिका ओबीसी नेत्यांची आहे.

आजच्या या सभेत छगन भुजबळ नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुंडे बंधू - भगिनींना निमंत्रण देण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com