Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांसह मिलिंद एकबोटे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांसह मिलिंद एकबोटे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Published by :

अमोल धर्माधिकारी: पुणे | धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे तसेच वादग्रस्त कालिचरण महाराज यांच्या विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी संघटक कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे बंधू नंदकिशोर आणि कालिचरण महाराज  यांच्यासह सहा जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. पोलीसनाईक सोमनाथ ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

मिलींद रमाकांत एकबोटे (कार्याध्यक्ष – समस्त हिंदु आघाडी संघटना शिवाजी नगर) मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे (सामाजीक कार्यकर्ता) कालीचरण महाराज (रा. अकोला ) कॅप्टन दिगेंद्रकुमार नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com