Pune Rains : गुरुवार पेठेतील जुना वाडा कोसळून; ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू

Pune Rains : गुरुवार पेठेतील जुना वाडा कोसळून; ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू

एकाला वाचवण्यात अग्निशामक दल आणि पोलिसांना यश

पुणे : मागील 24 तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच गुरुवार पेठेतील जुना वाडा कोसळला (Wada Collapsed) आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु आहे.

Pune Rains : गुरुवार पेठेतील जुना वाडा कोसळून; ढिगाऱ्याखाली अडकून एकाचा मृत्यू
'ओबीसींविरोधात निकाल लागला तर शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या गाड्या फोडू'

पुण्यातील गुरुवार पेठेतील हमेजान चौकात वाडा कोसळला असून ढिगाऱ्याखाली अडकून एक जण जागीच ठार झाला आहे. तर, एकाला वाचवण्यात अग्निशामक दल आणि पोलिसांना यश आते आहे. लक्ष्मण माळी असे मयताचे नाव आहे. वाड्याच्या शेजारीच इमारतीचे बांधकाम सुरु होते. येथे माळी हे मजूर कामगार म्हणून कार्यरत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com