विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आज विधानपरिषदेतील मे आणि जून या महिन्यात कार्यकाळ संपत आलेल्या 10 विधानपरिषदेतील आमदारांचा सायंकाळी 5 वाजता निरोप सभारंभ कार्यक्रम असणार आहे. विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com