गोरेगाव पत्राचाळीच्या ई शुभारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी नागरीकांना घातली अट…

गोरेगाव पत्राचाळीच्या ई शुभारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी नागरीकांना घातली अट…

मुंबईत हक्काच घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यादृष्टीनं आजचा शुभ दिन आहे. अनेकजण पोटापाण्यासाठी मुंबईत येत असतात. त्यांचे किमान हक्काचं घर असावे असे स्वप्न असते. ते स्वप्न या कामाच्या निमित्तानं पूर्ण होत असल्याचा आनंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळीच्या ई शुभारंभानंतर निमित्त व्यक्त केला. यासह मुख्यमंत्र्यांनी नागरीकांना अट घालत भावनिक आवाहनही केले आहे.

सिद्धार्थनगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई शुभारंभ पार पडला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय बंदरे अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.

मुंबईत अनेक लोक पोटापाण्यासाठी येतात आणि राहतात. पण घर मिळाल्यानंतर घर विकून हा संघर्ष वाया जाऊ देऊ नका. या घरांसाठी संघर्ष करता, करता, घरांच स्वप्न पाहता-पाहता अनेकजण आपल्यातून निघूनही गेले. या घरात पाऊल टाकताना त्यांची आठवण ठेवा आणि कृपा करून मिळालेली ही घर विकून मुंबई बाहेर जाऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं.

आज तुमच्या हक्काच्या घराचे भुमीपूजन होत आहे. लवकरच घरही मिळतील मात्र घर झाल्यानंतर चहाला बोलवायला विसरू नका. लवकरच घरही मिळेल कृपा करून हे हक्काचे घर सोडू नका, अशी अटही मुख्यमंत्र्यांनी नागरीकांना घातली आहे.

सुभाष देसाईंनी या कामासाठी पिच्छा पुरवला होता. प्रत्येक भेटीत पत्रावाला चाळीबाबत ते बोलायचे. कामं मोठी आहेत. अडचणी डोंगराएवढ्या आहेत. पण एकदा का अडचणी सोडवायच्या म्हटलं तर त्या सोडवल्या जाऊ शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, हा प्रकल्प किती जुना आहे, त्यात काय अडचणी आल्या याचा पाढा वाचणार नाही. चिकाटी असेल तर सर्व काही होतं. जिद्द असली की सर्व काही होतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com