PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर

PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे वाटप होणार आहे. सोलापुरात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होणार आहेत. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारण्यात आली आहेत. अमृत योजनेतून 8 शहर आणि जिल्ह्यातील 1700 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार असून 10 हजार लाभार्थ्यांना PM स्वनिधी योजनेतून कर्जवाटप केलं जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com