आडम मास्तरांकडून पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

आडम मास्तरांकडून पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमात बोलत असताना आडम मास्तरांकडून पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेताना चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी तात्काळ माफी मागत चूक सुधारली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com