यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या मेळाव्यासाठी 2 हजार बसेस

यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या मेळाव्यासाठी 2 हजार बसेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी साडेचार वाजता मोदी यवतमाळमध्ये येणार आहेत. पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारी परिसरात मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला येण्यासाठी महिलांना गावातच एसटी महामंडळाची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास दोन हजार बसेस प्रत्येक गावात जाऊन महिलांना मेळाव्याच्या ठिकाणी घेऊन येणार आहे.

या बसमध्ये प्रत्येक महिलेला प्रत्येकी दीड लिटर पाणी, विविध वस्तुंचा समावेश असलेला खाद्य पदार्थांचा बॅाक्स दिले जाणार आहेत. मोदी बचत गटाच्या महिलांना करणार संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत.

यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या मेळाव्यासाठी 2 हजार बसेस
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज यवतमाळ दौरा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com